आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हीन निंदनीय टीका केल्याच्या निषेधार्थ शनिवारी ( १७ डिसेंबर) ला नगर शहर भाजपच्या वतीने लक्ष्मीकारंजा येथील पक्ष कार्यालय परिसरात बिलावल भुट्टो यांच्या पुतळ्यास चपला मारून पुतळ्याचे दहन करण्यात आले. शेवगाव येथेही भुट्टो यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध नोंदवण्यात आला.
नगर शहर भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात शहर भाजपाचे महेश नामदे, तुषार पोटे, बाळासाहेब गायकवाड, अजय चितळे, नरेंद्र कुलकर्णी, अंजली वल्लाकटी, छाया रजपूत, मल्हार गंधे, ज्योती दांडगे, कालिंदी केसकर, रेखा विधाते, संध्या पावसे, पल्लवी जाधव, अनिल गट्टाणी, संतोष गांधी, मिलिंद भालसिंग, सुमित इपलपल्ली, कुंडलिक गदादे, राहुल बुधवंत, राजेंद्र घोरपडे, सुमित बटुळे, सुनील सकट, श्रीगोपाल जोशी, चंद्रकांत पाटोळे, अमोल निस्ताने, सचिन पावले, श्रीकांत फंड, अभिषेक दायमा, महेश तवले, आदेश गायकवाड, जालिंदर शिंदे, ज्ञानेश्वर धिरडे, लक्ष्मीकांत तिवारी आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देवून परिसर दणाणून सोडला.
शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे म्हणाले, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला घेरण्यात अपयशी ठरलेल्या बिलावल भुट्टो यांच्या निंदनीय वक्तव्याचा निषेध करावा तितका कमी आहे. हा पूर्ण भारताचा अपमान आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही अशोभनीय टिप्पणी केली आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत. असे गंधे यांनी म्हटले आहे.यावेळी ज्येष्ठ नेते वसंत लोढा म्हणाले, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पूर्ण जगात भारताची प्रतिमा उंचावत प्रतिष्ठा निर्माण केली आहे. हे सहन न झाल्यानेच पाकिस्तानी कुत्रे भुंकत आहेत.
मात्र त्यांच्या भुंकण्याने काही फरक पडत नाही. अशा बेशरमपणे बोलण्याने भारताची प्रगती थांबणार नाही. सचिन पारखी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण जगात दहशतवादा विरोधात लढाई सुरु केली असून त्यास यशही येत आहे. आतंकवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानला हे बघवत नसल्याने ते असे खालच्या पातळीवर जात आरोप करत आहेत. त्यास कोणीही भीक घालणार नाही. शहर भाजपचा तीव्र निषेध करत आहे. असे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.