आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन

श्रीगोंदे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील काष्टी येथील शिवभक्त तरुणांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अपशब्द वापरुन बेताल वक्तव्य केल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करुान निषेध करण्यात आला. यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय च्या घोषणा देण्यात आला. आैरंगाबाद येथे एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करुण शिवप्रेमीची मने दुखावली.

या वक्तव्याचा निषेध म्हणून काष्टी साईनगर, सावतानगर येथील तरुणांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रतिमेचे दहन करुन निषेध केला. यावेळी अनिल शेलार, सुहास उरमुडे, गणपत कोकाटे, दता पाचपुते, शांताराम कोकाटे, डॉ. संदीप कोकाटे, संजय फडणीस, राहुल पाचपुते, संतोष पाचपुते, दत्ता मोटे, पोपट धुमाळ, सुनिल क्षीरसागर, उमेश शेलार, मकरंद वहाडणे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...