आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगधंदे वाढावेत:‘युवकांना लवकर रोजगार देणारे उद्योगधंदे वाढावेत’ ; स्वयंसेवकांना सहयोग करत असल्याने सन्मानित केले

नगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावातील शैक्षणिक प्रगतीसाठी व तरुण मुलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून द्यायला मदत करणे गरजचे आहे, असे प्रतिपादन आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्र कामरगाव येथे युथनेट मेळावा पार पडला. यावेळी राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय काकडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सरपंच व स्वयंसेवकांना सहयोग करत असल्याने सन्मानित केले गेले. देशातील अल्पशिक्षित, गोरगरीब युवक युवतींना मोफत अल्पकालावधीचे कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रथम संस्थेचे कार्य हे उत्कृष्ट असल्याचे पवार यावेळी म्हणाले. यावेळी शिवाजी कदम, सचिन चांदोरकर, दिवाकर भोयर, प्रदिप बांगर, सुशील गायकवाड, दीपक शिरोळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...