आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा आयुक्त जावळे यांचे आश्वासन:जयंतीपर्यंत डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मार्केट यार्ड चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, आंबेडकर जयंतीपर्यंत (१४ एप्रिल) उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिले. दरम्यान, या पूर्णाकृती पुतळ्यासाठी सुमारे १८ लाख रुपये खर्चाची निविदा येत्या दोन दिवसात प्रसिद्ध केली जाणार आहे. बाजार समिती चौकात सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा आहे. तेथे पूर्णाकृती पुतळा उभारून सुशभीकरण केले जाणार आहे.

यासाठी पूर्णाकृती पुतळा समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक सोमवारी आमदार संग्राम जगताप व मनपा आयुक्त जावळे यांच्या उपस्थितीत झाली. अशोक गायकवाड, अजय साळवे, राहुल कांबळे, प्रशांत गायकवाड, किरण दाभाडे, गौतमी भिंगारदिवे, संजय कांबळे, विशाल गायकवाड, तुकाराम गायकवाड, प्रतीक बोरसे, रोहित आव्हाड, विजय भांबळ, सुमेध गायकवाड, मनपाचे शहर अभियंता सुरेश इथापे, परिमल निकम आदी उपस्थित होते.

शहर अभियंता इथापे यांनी सांगितले की, चौथऱ्यावर ९ फूट उंचीचा ब्रांझ धातूचा पुतळा उभारला जाणार आहे. त्यासाठी १८ लाख रुपये खर्चाची निविदा येत्या दोन दिवसात प्रसिद्ध केली जाईल. सुशोभिकरणासाठी स्वतंत्र तरतूद केली जाणार आहे. पुतळ्याच्या प्रतिकृतीला राज्य सरकारच्या कला संचालनालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर पुतळा तयार केला जाईल. यासाठी बाजार समिती चौकात सुमारे सहा गुंठे जागा उपलब्ध आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणानंतर सुमारे साडेतीन गुंठे जागा पुतळा व सुशोभीकरणासाठी उपलब्ध होईल.

बातम्या आणखी आहेत...