आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श पुरस्कार वितरण सोहळा:समाजासाठी काम केल्याने माणसात देव पाहता आला; आमदार निलेश लंके यांचे प्रतिपादन

कौठाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्ही गोरगरीब समाजासाठी केले. तरच जनता डोक्यावर घेते. कोरोना मी जवळून पाहिला आहे. माझ्या जीवा पेक्षा जनतेचा जीव महत्त्वाचा आहे. त्यासाठी काम केले. आणि गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याचे काम केले. समाजासाठी काम केल्याने माणसात देव पाहता आला, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.

टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती डॉ. वंदना मुरकुटे होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री पुरस्कार विजेत्या राहिबाई पोपेरे उपस्थित होते .या राज्य स्तरीय पुरस्काराचे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना आमदार लंके याच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. नेवासे तालुक्यातील रस्तापूर येथील उपसरपंच बापूसाहेब अंबाडे यांना आदर्श उपसरपंच म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आमदार लंके म्हणाले, कुटुंबासाठी काम न करता समाजासाठी कोरोना काळात भरीव काम झाले. त्यामुळे रात्रंदिवस कोरोना बरोबर संघर्ष चालू होता. याप्रसंगी डॉ. वंदना मुरकुटे, अशोक कानडे, दिनकर टेमकर, अशोक कानडे अदिनी आपले विचार मांडले तसेच या सोहळ्यासाठी सरपंच वसंतराव उकिडेॅ, उपसरपंच बापूसाहेब अंबाडे, भाऊसाहेब सावंत, भाऊसाहेब डाके, फिरोज शेख, छोटुमियां शेख, जनार्दन भाकरे, अजित अंबाडे, डॉ.सोमनाथ उकिडे, रसिक काका गांधी,भागीनाथ नजन, बापूसाहेब डांगे, गणेश अंबाडे, सनी गाढवे,बाबासाहेब धुमाळ, राम किसन अंधाळे, भिकाजी हारकळ, विठ्ठल भाकरे अदि उपस्थित होते.

समाजासाठी रात्रंदिवस काम करणाऱ्यांचा गौरव करताना समाधान
गोरगरीब जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करताना राजकीय रंग न पाहता जो समाजासाठी रात्रंदिवस काम करतो. अशांचा गौरव करताना आपणास समाधान वाटते. आणि प्रत्येकाने समाजात असे देव शोधण्याचे काम करावे, असे आमदार लंके यावेळी बोलताना म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...