आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात:तक्रार देण्यासाठी आल्या अन् पोलिस ठाण्यात भिडल्या

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तक्रार देण्यासाठी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आलेल्या दोन महिला एकमेकांशी भिडल्या. शनिवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघींना ताब्यात घेत त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलिस अंमलदार कोमल जाधव यांनी फिर्याद दिली.

श्रध्दा उत्तम जाधव (वय २४, रा. काटवन खंडोबा रोड, नगर) व आल्मास रिझवान शेख (रा. सदर बाजार, भिंगार) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. त्या दोघी शनिवारी दुपारी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आल्या होत्या. पोलिस ठाण्याच्या आवारात त्यांचे एकमेकांशी वाद झाले. श्रध्दा जाधव हिने पोलिस ठाण्याच्या आवारात मोठमोठ्याने आरडाओरडा करून, ‘मी आत्महत्या करीन’, अशी धमकी देवून शिवीगाळ केली. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ दोघींना ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...