आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:निष्काळजीपणाला क्षमा नाहीच; सिव्हिल आगीचा अहवाल मागवला

नगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणात जे कोणी आरोपी आहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, निष्काळजीपणाला क्षमा नाही. निरपराध लोकांचे बळी गेले आहेत, या अग्निकांड प्रकरणाचा अहवाल मागवला आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.नगरच्या जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला रविवारी वर्ष पूर्ण झाले. ‘दिव्य मराठी’ने “अहवाल गुलदस्त्यात “फायर फायटर बसले; पण चाचणीला लागेना मुहूर्त..’असे वृत्त रविवारी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत रविवारी नगरमध्ये आलेल्या महसूल मंत्री विखे यांनी या अग्निकांडाचा अहवाल मागवला.

आगीच्या घटनेनंतर प्रशासकीय स्तरावर चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीने कागदपत्रे जुळवून तयार झालेल्या अहवालाची फाईल मंत्रालयात सादर केली मात्र या चौकशी अहवालात काय होते ? हे मात्र वर्षभरानंतरही गुलदस्त्यातच आहे. या अग्निकांडानंतर अडीच कोटी रुपये खर्च करून जिल्हा रुग्णालयात बसवलेल्या फायर फायटर यंत्रणेचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी केवळ चाचणीसाठी मुहूर्त अडला आहे.

मंत्री विखे म्हणाले, या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न गंभीर होता. लोकांचे जीव गेले. मी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. दरम्यान, अडीच वर्षांत महाविकास आघाडीचे अनेक घोटाळे आहेत. घोटाळे उघडकीस येण्यापेक्षा ते गुंडाळून ठेवले, असा आरोपही मंत्री विखे यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...