आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाक:फळांचे कॅरेट, हातगाडी आगीत खाक ; कोतवाली पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग लागल्याने ४७० छोटे व मोठे फळांचे कॅरेट व फळविक्रीची हातगाडी जळून खाक झाली. या प्रकरणी कोतवाली पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौसिफ नुर मोहमद बागवान (वय ३२, रा. काटवन खंडोबा, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी बागवान व त्यांचे मित्र आवेज अलनसिर बागवान या दोघांचा फळविक्रीचा व्यावसाय आहे. ते फळविक्रीचे कॅरेट तसेच हातगाडी वसिम शेख व सादाब शेख यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेत ठेवत असत. शुक्रवारी दुपारी एक ते तीनच्या दरम्यान फळविक्रीचे रिकामे कॅरेट आणि हातगाडीला अचानक आग लागली. या आगीमध्ये ४६ हजार ५०० रूपयांचे कॅरेट आणि पाच हजार रूपयांची हातगाडी असा ५१ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला. आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. कोतवाली पोलिस अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...