आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मुस्लिम समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आशा निंबाळकर यांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हमजा शाहिद शेख (रा. हातमपुरा, नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. दरम्यान, मुस्लिम समाजाबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्यावतीने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे करण्यात आली होती.

मुस्लिम समाजाच्यावतीने शहर उपअधीक्षक अनिल कातकाडे यांना निवेदन देण्यात आले. बुधवारी नगर शहरातून सकल हिंदू समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा संपल्यानंतर मुस्लिम समाज पोलिस अधीक्षक कार्यालयात जमा झाला होता. मोर्चादरम्यान शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याने मुस्लिम समाजाबाबत अपशब्द वापरले.

यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा दावा करत त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्वरीत अटक करण्यात यावी, आणखी कोणीही या मोर्चामध्ये मुस्लिम समाजाविरूध्द काही अपशब्द वापरले असेल, तर त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी, कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान उपअधीक्षक कातकाडे यांनी दखल घेत कोतवाली पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर आशा निंबाळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...