आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीवाचक नावाचा उल्लेख:सातबाऱ्यावरून जातीचा उल्लेख झाला हद्दपार

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महसूल विभागाने सातबारा उताऱ्यावरील ‘शेतीचे स्थानिक नाव’ या रकान्यात जातीवाचक नावाचा उल्लेख न करण्याचा पुरोगामी निर्णय मागील वर्षी घेतला होता. या निर्णयाची अहमदनगर जिल्ह्यातील प्रथम अंमलबजावणी राहाता व नेवासे तालुक्यात करण्यात आली आहे. राहातामधील बाभळेश्वर व नेवासेमधील रामडोह, गोपाळपूर, वरखेड, माळेवाडी दुमला, सुरेगाव दहिगाव, गळनिंब व खामगाव या गावातील ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिली. त्यामुळे या गावातील ७/१२ उताऱ्यावरील जातीची नावे हद्दपार होणार आहेत.

समाजातील जाती-पातीच्या भिंती गळून सामाजिक सलोखा व सौहार्दपूर्ण वातावरण टिकून राहावे. यासाठी शासनाच्या महसूल विभागाने २५ ऑगस्ट २०२१ रोजी ७/१२ उताऱ्यातील ‘शेतीचे स्थानिक नाव’ या या रकान्यात नोंदवण्यात आलेल्या जातीवाचक नावाची नोंद कमी करून सुधारित नोंद घेण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केला होता. राहाता तालुक्यात बाभळेश्वर ग्रामपंचायतीने ७/१२ उताऱ्यावर जातीच्या नावाचा उल्लेख न करण्याचा ठराव केला.

बाभळेश्वर गावातील शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावरील ‘शेतीचे स्थानिक नावमधील जातीचा गट नंबर हा उल्लेख हद्दपार करत ‘बनसोडे यांचा गट नंबर’ असा उल्लेख असलेला ७/१२ उतारा देण्यात आला. तहसीलदार कुंदन हिरे म्हणाले, ७/१२ उताऱ्यावरील जातीचे नाव हद्दपार करण्याच्या निर्णयाने गावागावात सामाजिक वातावरण निकोप होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...