आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरांची निगा:पशुपालकांनी घाबरून जास्त भावाची लस घेऊ नये : डॉ. डौले

नेवासे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लम्पी या त्वचारोगाच्या प्रादुर्भावामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांची निगा ठेवून नियम पाळले, तर घाबरण्याचे कारण नाही, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब डौले यांनी केले. नेवासे तालुक्यात लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाची १६ जनावरे आढळल्यामुळे सहाजिकच पशुपालक शेतकरी चिंतेत आहेत. कारण हा रोग व्हायरस प्रकारमधील आहे. यासाठी लसीकरण हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. नेवासे तालुक्यात ज्या ठिकाणी या रोगाचे प्रादुर्भाव दिसून आला, त्या ठिकाणी १०० टक्के लसीकरण होत आहे. आजही नेवासे तालुक्यासाठी पाच हजार लसींचा पुरवठा झाला असून त्याचे लसीकरणही युद्धपातळीवर झाले. या रोगाचा माणसांनाही प्रादुर्भाव होईल व त्रास होईल अशी अफवा आहे. या अफवेला कोणीही बळी पडू नये. कारण जगभरात कोठेही असा प्रकार झालेला नाही, असेही डॉ. डौले यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...