आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:जनावरे नेणाऱ्या वाहनाचा अपघात;राजूर शिवारातील घटना, एका म्हशीचा मृत्यू

मोताळा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर येथून म्हशी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास राजूर शिवारात घडली. या अपघातात एका म्हशीचा मृत्यू झाला आहे.इंदूर येथील जाकीर खा यांच्या म्हशी घेऊन एम.पी.०९/ जी.एच. / १७३२ या क्रमांकाचे आयशर वाहन बुलडाण्याकडे जात होते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी राजूर शिवारातील पुठ्ठा फॅक्टरी जवळ या वाहनाचा अपघात झाला.

वाहन पलटी झाल्यामुळे एका म्हशीचा मृत्यू झाला असून तीन म्हशींसह वाहन चालक व त्याचा सहकारी जखमी झाले आहेत. अपघात घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात हलवलेे. घटनेची माहिती बोराखेडी पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळताच राजूर येथे गणपती विसर्जन मिरवणूक बंदोबस्तावर असलेले पीएसआय अनिल भुसारी यांनी बोराखेडी ठाणेदाराच्या आदेशाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी पशू वैद्यकीय अधिकाऱ्यास पाचारण करून मृत म्हशीचे शव विच्छेदन करून जखमी म्हशीवर उपचार केले. त्यानंतर पोलिसांनी तपास करून बारा म्हशी मूळ मालकाच्या नातेवाइकांच्या हवाली केल्या.

बातम्या आणखी आहेत...