आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक:नेवाशात परशुराम जयंती उत्साहात साजरी; भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

नेवासे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे शहर ब्राह्मण सभेच्या वतीने परशुराम जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेला व महाआरतीला मोठा प्रतिसाद मिळाला. भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त ब्राह्मण समाजाच्या वतीने मोहिनीराज महाराज मंदिरापासून सजवलेल्या रथातून भगवान परशुराम यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येऊन टाळ मृदुंगाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी श्रीज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळाचे भानुदास गटकळ, भाऊसाहेब माळवे, भानुदास तोगे, अशोक लोखंडे, विष्णुपंत औटी, अनंत मापारी, गायके मिस्तरी, नवनाथ बर्डे, बंडाअप्पा कुर्ले यांनी अभंग, भजने सादर केली.

त्यानंतर सजवलेल्या रथात भगवान परशुरामांची मूर्ती रथाच्या मागे महिला, पुरुष भाविक अशी मिरवणूक औदुंबर चौक, विश्वेश्वर नाथबाबा चौक, श्रीखोलेश्वर गणपती मंदिर, नगर पंचायत चौकमार्गे श्रीहनुमान मंदिर येथून श्रीमोहिनीराज मंगल कार्यालयात आल्यावर आरती करण्यात आली. पाठशाळेत डॉ. विप्रदास यांच्या हस्ते भगवान परशुरामाची आरती करण्यात आली. यावेळी उदयकुमार बल्लाळ, डॉ. प्रणव जोशी यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...