आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुळा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासे येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध जातीचे १०१ वृक्ष लागवडीचा उपक्रम संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे शिवाजी देशमुख महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यशवंतराव गडाख यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करता करता त्रास देणाऱ्यांना देखील सांभाळले हेच गडाखांचे मोठेपण असल्याचे देशमुख महाराज म्हणाले.
यावेळी ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी वृक्षारोपण हा यशवंतराव गडाखांच्या जीवनात महत्त्वपूर्ण उपक्रम राहिला. तोच वारसा घेऊन आजचे हे वृक्षारोपण आहे. भविष्यात या वृक्षांच्या सावलीत ‘ओपन लायब्ररी’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे, असे सांगितले. शिवाजी देशमुख महाराज यांनी यशवंतराव म्हणजे हे अगदी झाडासारखे व्यक्तिमत्त्व आहे. ज्याप्रमाणे झाड लावणी करून पाणी घालून पालपोषण करणाऱ्याला सावली देते, त्याचप्रमाणे कुऱ्हाड घेऊन तोडण्यासाठी आलेल्या व्यक्तीलाही तुटेपर्यंत सावलीच देते.
अगदी त्याचप्रमाणे गडखांनी आजपर्यंतचे आयुष्य माऊलींच्या वरील ओवीप्रमाणेच व्यतीत केले. यावेळी माजी प्राचार्य रघुनाथ आगळे, राधा गडाख, नेहल गडाख, साक्षी गडाख, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, नंदकुमार पाटील, नगरसेवक दिनेश व्यवहारे, अंबादास ईरले, बापूसाहेब गायके, सतीश पिंपळे, पी. आर. जाधव, नारायण लोखंडे, शिवा जंगले, अॅड. बन्सी सातपुते, अॅड. कारभारी वाखुरे, अॅड. वसंतराव नवले, राजेंद्र उंदरे, प्रा. रमेश शिंदे, विनायक नळकांडे, कैलास कुंभकर्ण, अमृत फिरोदिया, महेश मापारी, अभय गुगळे, रामकृष्ण कांगुणे, दत्तात्रय कांगुणे, यासीन शेख, डॉ. मुरलीधर कराळे, सुनील जाधव, सौरभ मुनोत, प्रदीप राजगिरे, रमेश शिंदे, अमोल मांडण, अॅड. मयूर वाखुरे, अल्पेश बोरकर, गणेश कोरेकर, उपप्राचार्य प्रा. अरुण घनवट, उपप्राचार्य प्रा. दशरथ आयनर, प्रकाश सोनटक्के, गपाट मामा, राजेंद्र मुंगसे उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.