आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग दिन:निमगाव वाघा येथे योग दिन उत्साहात साजरा ; शिक्षक कर्मचारी सहभागी

नगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील निमगाव वाघा येथे नेहरू युवा केंद्र, नवनाथ विद्यालय, श्रीनवनाथ युवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. नवनाथ विद्यालयाच्या मैदानावर शालेय विद्यार्थ्यांना योगाचे धडे प्रात्यक्षिकासह देण्यात आले. योग दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी, युवक-युवती, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. या योग शिबीरात डॉ. सुनील गंधे यांनी उपस्थितांना योग व प्राणायमाचे धडे दिले. क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार यांनी देखील विविध आसनाचे प्रात्यक्षिक करून घेतली. यावेळी नवनाथ विद्यालयाचे मुख्यध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नाना डोंगरे, संदीप डोंगरे, वैभव हिरवे, निळकंठ वाघमारे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...