आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराज्याभिषेक दिन:स्वराज्याची गुढी उभारत काकडवाडीत शिवराज्याभिषेक दिन साजरा

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील काकडवाडी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोमवारी स्वराज्याची गुढी उभारत साजरा करण्यात आला. काकडवाडी ग्रामपंचायतीवर सेवानिवृत्त सैनिक पोपट ढवळे, सरपंच संपत मुळे यांच्या हस्ते स्वराज्याची गुढी उभारली गेली. छत्रपती शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्यास राजे ग्रुप प्रतिष्ठान व ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पहार अर्पण करत छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी घोषणा देत जयघोष करण्यात आला. भारत सीमेवर १९ वर्षे सेवा बजावणारे सेवानिवृत्त सैनिक ढवळे यांचा सन्मान करण्यात आला. उपसरपंच जनार्दन कासार, सदस्य अशोक मुळे, कैलास मुळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दत्तात्रय ढवळे, ग्रामसेविका प्रतिभा गांडोळे, राजे ग्रुप प्रतिष्ठानचे अर्जुन शिरसाठ, उपाध्यक्ष दत्तू मुळे, भाऊ पाटील ढवळे, संपत शिरसाठ, बाबासाहेब झुरुळे, गणपत मुळे, आदिनाथ झुरुळे, बस्तीराम मुळे, प्रकाश तुपसुंदर आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

काकडवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक स्वराज्याची गुढी उभारत साजरा करताना सेवानिवृत्त सैनिक पोपट ढवळे, सरपंच संपत मुळे, उपसरपंच जनार्दन कासार, अशोक मुळे, कैलास मुळे, दत्तात्रय ढवळे, ग्रामसेविका प्रतिभा गांडोळे.

बातम्या आणखी आहेत...