आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्त्यांची उपस्थिती:आमदार पाचपुते यांचा वाढदिवस साजरा ; कोरोना काळात वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता

श्रीगोंदेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे तालुक्याचे आमदार बबनराव पाचपुते यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्ष वेधणारी होती. आमदार पाचपुते यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या काष्टी येथील निवासस्थानी सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. दोन वर्षे कोरोना काळात पाचपुते यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. याही वर्षी वाढदिवसाचे कोणतेही ठरवून नियोजन नव्हते. वाढदिवस साजरा करण्याच्या बाबतीत कोणत्याही सूचना मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना दिल्या नव्हत्या. परंतु तरीही हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी सकाळपासून पाचपुते यांना शुभेच्छा देण्यासाठी रांगा लावल्या होत्या. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार अशोक बापू पवार, राहुल कुल, प्रसाद तनपुरे, अरुण जगताप, सुरेश धस, वासुदेव काळे, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, भानुदास बेरड, जि. प. सदस्य सचिन जगताप, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, नेते मंडळींनीही पाचपुते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मतदारसंघातील सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...