आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा रुग्णालय मंगळवारी (२१ जून) आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. जागतिक योगदिनानिमित्त जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सकाळी ७ ते ८ यावेळेत योग वर्गाचे आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या योग वर्गात आयुष मंत्रालय भारत सरकारने निर्देशीत कॉमन योग प्रोटोकॉल प्रमाणे योगासने, प्राणायाम, ध्यान करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व परिचर्या विद्यार्थीनी व विद्यार्थी उपस्थित होते. योगवर्गाचे तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वसंत जमदाडे यांच्या हस्ते वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना धोंडे-बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज घुगे, डॉ.महारूद्र खरपाडे, डॉ. सचिन सोलट, जिल्हा रुग्णालयाच्या अधिसेविका व्ही. आर. गायकवाड, अधिपरिचारिका छाया जाधव, सीमा शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जमदाडे यांनी योग शास्त्राचा रोगोपचार आणि स्वास्थ रक्षणासाठी महत्त्व विशद केले. जिल्हा रुग्णालयाच्या आयुष कक्षामध्ये योग विभागात दररोज नागरिकांना योग सहज देण्यात येतो. या सुविधेचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना धोंडे यांनी दररोज योग्याभ्यास करण्यासाठी आवाहन केले. योगामध्ये सातत्य असल्यास मन व शरीर निरोगी राहते, असे त्यांनी सांगितले. यावेळी अधिसेविका व्ही. आर. गायकवाड तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य खटके यांनीही मार्गदर्शन केले.
योग वर्गाचे संचालन जिल्हा रुग्णालयाच्या योगतज्ञ मोहिनी जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. शौनक मिरीकर, डॉ. इर्षाद मोमीण, डॉ. जयश्री म्हस्के, डॉ. नाझिया शेख, डॉ. शोभा धुमाळ, औषध निर्माता माधुरी ठोंबरे, संगीता नन्नवरे आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.