आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेवगाव येथे भगवान परशुराम जयंती मंगळवारी (३ मे) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बालाजी मंदिर येथून भगवान परशुरामाच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. तेथून मिरवणूक क्रांती चौकातील गणपती मंदिर येथे आल्यानंतर त्याठिकाणी महाआरती व प्रतिमा पूजन पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समस्त बहुभाषिक ब्राह्मण समाज, परशुराम सेवा संघाचे कार्यकर्ते सहभागी झाल्याने मिरवणुकीला विशेष शोभा आली होती.
ब्राह्मण समाजातील महिलांनी उस्फूर्तपणे सहभागी होत परशुराम जयंतीचा उत्साह अजूनच वाढवला. बालाजी मंदिर येथे मिरवणुकीची समाप्ती करण्यात आली. त्याठिकाणी दिनकर महाराज अंचवले यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम झाला. यावेळी अॅड.विजय जोशी, संजय मुळे, डॉ. दिनकर कुलकर्णी, दिलीप मुळे, सचिन मुळे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी परशुराम सेवा संघाच्या वतीने भारदे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष हरीश भारदे, योगेश तांबोळी, बाळासाहेब देशपांडे, सुशांत बीडकर, शशिकांत देऊळगावकर यांचा सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन मुकुंद अंचवले यांनी केले. आभार गणेश देशपांडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, मुकुंद गाडेकर, वसंत देवधर, नीलेश जोशी, देवीप्रसाद जोशी, श्याम मुळे, अनंत मुळे, महेंद्र मुळे, वसंत मुळे, डॉ. अभय देशपांडे, मंदार मुळे, विशाल जोशी, पियूष क्षीरसागर, मयूर मुळे, गौरव देशपांडे, राजेंद्र देशपांडे, राजेंद्र वयकर, वरुण सावरकर, प्रणव वडकर, शुभम मुळे, योगेश मुळे, राजेंद्र भंडारी, वसुधा सावरकर, विदुला मुळे, राजश्री रसाळ, शुभांगी मुळे, लता मुळे, अलका देशपांडे, माया मुळे आदींनी परिश्रम घेतले. महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.