आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे आश्वासन:केंद्र व राज्य सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
जलजीवन मिशन योजने अंतर्गत नगर तालुक्यातील बुऱ्हानगर पाणी योजनेतील वाढीव कामाच्या पाणी योजनेचा शुभारंभ तसेच ज्येष्ठांना वयोश्री योजनेचे साहित्य वाटप कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीत बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील. - Divya Marathi
जलजीवन मिशन योजने अंतर्गत नगर तालुक्यातील बुऱ्हानगर पाणी योजनेतील वाढीव कामाच्या पाणी योजनेचा शुभारंभ तसेच ज्येष्ठांना वयोश्री योजनेचे साहित्य वाटप कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीत बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील.

केंद्र व राज्य सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जाणार आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहेत. महाविकास आघाडी सरकारने जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा सूडाचे राजकारण केले आहे. मात्र, आम्ही ते न करता विकासाच्या प्रश्नाकडे अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. या पुढील काळात आपण सर्वजण एकत्रित येऊन भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत घेऊन जाऊ, असे आश्वासन नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

जलजीवन मिशन योजने अंतर्गत नगर तालुक्यातील बुऱ्हानगर पाणी योजनेतील वाढीव कामाच्या पाणी योजनेचा शुभारंभ तसेच ज्येष्ठांना वयोश्री योजनेचे साहित्य वाटप व नगर तालुक्याच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सत्कार 7 सप्टेंबर रोजी सोलापूर रोडवरील राम सत्य लॉन येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. या संदर्भात शुक्रवारी (२ सप्टेंबर) नियोजनाच्या बैठकीत खासदार सुजय विखे पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, भाजपाचे तालुकाध्यक्ष अरुण मुंडे, युवा नेते अक्षय कर्डिले, दिलीप भालसिंग, मनोज कोकाटे आदी उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले, नगर तालुक्याचा मी आमदार असताना विविध विकासाच्या योजना मार्गी लावल्या आहेत. जिरायत भागाला शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी युतीच्या काळात सरकारकडून बुऱ्हानगर पाणी योजना व घोसपुरी पाणी योजना मंजूर करून आणली आहे.

आता केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत बुऱ्हानगर पाणी योजनेच्या वाढीव कामासाठी मोठा निधी मंजूर झाला आहे. नगर तालुक्यातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी आमदार असताना वाड्या वस्त्यांवर रस्ता डांबरीकरणाची कामे मार्गी लावली आहेत. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नगर तालुक्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...