आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, वैज्ञानिक क्रांती व विचार जगाला प्रेरणादायी ठरत आहे. संविधानाने या देशातील प्रत्येक नागरीक, महिलेला समान न्याय, हक्क व अधिकार प्राप्त झाले आहे. त्यांच्या विचारांवरच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार त्यांच्या विचाराला चालना देण्याचे काम करत आहे.असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी मंगळवारी ( 6 डिसेंबर) ला केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहर भाजपाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी मार्केट यार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते वसंत लोढा संघटन सरचिटणीस विवेक नाईक, सरचिटणीस महेश नामदे, तुषार पोटे, अभय आगरकर, सुवेंद्र गांधी, चंद्रकांत पाटोळे, उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, रवींद्र बारस्कर, ज्ञानेश्वर काळे, लक्ष्मीकांत तिवारी, रियाज कुरेशी, ज्ञानेश्वर धिरडे, रोहन शेलार, सागर शिंदे, रेखा विधाते, श्रीकांत फंड, सुनील सकट, बाळासाहेब खताडे, मिलिंद भलसिंग, देवकी भापकर, लिला अग्रवाल, कुंडलिक गदादे, मीरा सरोदे, मनेश साठे, राहुल बुधवंत, कुसुम शेलार आदि उपस्थित होते.दरम्यान
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे, रिपाईचे नेते संजय कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विजय भांबळ, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, विलास साठे, महिला अध्यक्षा कविता नेटके, दीपक गायकवाड, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबासाहेब राजगुरू, नानासाहेब तूपेटे, जयराम आंग्रे, अविनाश कांबळे, रावसाहेब रंधवे, मच्छिंद्र गांगर्डे, बापू जावळे, कृपाल भिंगारदिवे, दत्तात्रय जावळे, बाळासाहेब नेटके, सिद्धार्थ कांबळे, योगेश त्रिभुवन, लहू घंगाळे, सिद्धांत दाभाडे, प्रदीप पवार, दीपक पाडळे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.