आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीक्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांची यात्रेस सोमवारपासून (६ मार्च) सुरू होत आहे. १५ दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी विविध राज्यातून मोठ्या संख्येने भाविक मढी येथे येतात. दोन वर्षांच्या कालखंडानंतर यात्रा होणार असल्याने विक्रमी गर्दी होण्याची शक्यता देवस्थान समितीने व्यक्त केली आहे. होळी ते गुढीपाडव्यापर्यंत मढीची यात्रा भरते. मागील वर्षी कोरोनाचे निर्बंध घाल्या यात्रा कमी प्रमाणात भरली होती . यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असण्याची शक्यता आहे. पाथर्डीचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी बैठक झाल्यानंतर पाहणी करून पोलिस विभागाकडून वाहनतळ रस्ते व बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येत आहे.
यात्रेनिमित्त पुणे, नगर, पाथर्डी, कंरजी, तिसगाव, शेवगाव, सोलापूर, पंढरपूर, औरंगाबाद येथून विविध हॉटेल व्यावसायिक दाखल झाले आहेत . रहाटपाळणे, मनोरंजनाची साधने, प्रसाद, खेळणीची दुकाने थाटण्यासही सुरुवात झाली आहे. मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड, सचिव विमल मरकड ग्रामपंचायतीच्यावतीन े सरपंच संजय मरकड, उपसरपंच रवींद्र अारोळे, ग्रामसेवक विठ्ठल राजळे आदी यात्रेसाठी परिश्रम घेत आहेत.
देवस्थान समितीने १८ ते २१ मार्च दरम्यान गुढी पाडव्यापूर्वी चार दिवस अगोदर कानिफनाथांचे समाधीमंदिर दर्शनाला खुले ठेवून समाधी मंदिरात भाविकांना थेट प्रवेश मिळणार आहे. दरम्यान, नियोजन बैठकीत ठरल्याप्रमाणे संबंधित विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत . जे बुजवले ते मातीने बुजवल्याने माती टाकलेले खड्डे पुन्हा उघडे पडत असल्याने तत्काळ हे काम थांबवून डांबर-खडीने पॅचवर्कचे काम करावे, अशी मागणी होत आहे. तिसगाव मढी नवीन झालेल्या दिड किमी रस्ताच्या साईट पट्ट्या पूर्णपणे भरल्या नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.