आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:चाँद सुलताना शाळेत घुसून घेतला कार्यालयाचा ताबा

नगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१२ ते १३ जणांनी येथील चाँद सुलताना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून मुख्याध्यापक कार्यालयाचा ताबा घेतला. शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी शिक्षक जफर हसनमियाँ सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सय्यद अब्दुलमतीन अब्दुल रहीम, सय्यद वहाब, मौलाना शफीक रशीद कासमी, शेख गुलाम दस्तगीर, शेख अकील लियाकत, शेख समी इमाम, शेख तन्वीर चाँद, शेख समद वहाब, शेख नवेद रशीद, शेख मुशाहिद लियाकत (पत्ता माहिती नाही) व इतर दोन अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. दुपारी हायस्कूलच्या मुख्याधापक कार्यालयात १२ ते १३ जणांनी कार्यालयात घुसून मुख्याध्यापिकांना तुम्हाला बडतर्फ केलेले आहे. तुम्ही येथे बसू नका, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी धमकी दिली.

बातम्या आणखी आहेत...