आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिर्डी:राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर साईबाबांच्या दर्शन वेळेत बदल

शिर्डी25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारपासून सकाळी 7.15 ते रात्री 7.45 वाजेपर्यंतच भाविकांना मंदिर खुले

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने २८ मार्च २०२१ च्‍या कोविड -१९ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून भाविकांना साई दर्शनासाठी समाधी मंदिर सकाळी ०७.१५ ते रात्री ०७.४५ या वेळेत खुले राहणार आहे. तसेच श्री साई प्रसादालय हे सकाळी १०.०० ते रात्री ०७.३० या वेळेत सुरू राहील याची सर्व साईभक्तांनी नोंद घ्यावी, असे आवाहन साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आले.

रात्री ०८.०० ते सकाळी ०७.०० या वेळेत संपूर्ण राज्यात जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे साईभक्तांना दर्शनासाठी श्री साईबाबांचे समाधी मंदिर सकाळी ०७.१५ ते रात्री ०७.४५ या वेळेत खुले राहणार असून रात्री १०.३० या वेळेत होणारी श्रींची शेजारती व पहाटे ०४.३० वाजताची काकड आरती नेहमीप्रमाणे होईल. परंतु याकरिता भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच श्री साई प्रसादालय हे सकाळी १०.०० ते रात्री ०७.३० या वेळेत भाविकांकरिता सुरू असणार आहे. सर्व साईभक्तांनी या होणाऱ्या बदलाची नोंद घ्यावी व कोविड -१९ संदर्भातील नियमांचे पालन करून श्री साईबाबा संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहनही श्री साई शिर्डी संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...