आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक उपक्रम:श्रींच्या पालखीतील वारकऱ्यांची चरण सेवा

खामगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही श्री संत गजानन महाराजांच्या ५३ व्या पालखीचे पंढरपूर वरून रजतनगरीत २ ऑगस्ट रोजी नॅशनल हायस्कूल मध्ये आगमन झाले. शहरातील सामाजिक संस्था, कार्यकर्ते, व्यावसायिकांनी मोठ्या भक्ती भावाने श्री ची आरती पूजा व दर्शन घेत असतात. तसेच सामाजिक उपक्रमात जल सेवा, नास्ता, भोजन, चहा वाटप, पालखी मार्गातील साफ सफाई करून सेवेत सहभागी होऊन दुसऱ्या दिवशी खामगाव वरून शेगावला जाणाऱ्या पालखीत पायी जाऊन पुण्य अर्जित करतात. असाच सेवेचा एक उपक्रम मागील ३ वर्षांपासून जलंब येथील सुरभी सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पालखीतील वृद्ध व गरजू वारकऱ्यांची चरण सेवा (तेल मालिश) करण्यात येत आहे.

मागील दोन वर्ष कोरोना मुळे खंड पडलेली पालखीतील ही सेवा या वर्षी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली होती. या सेवेमध्ये हभप प्रकाश महाराज वाघमारे कानशिवनी, धीरज पारीख मेहकर, डॉ. अमित चौधरी यांनी दरवर्षी प्रमाणे निशुल्क मालीश तेल उपलब्ध करून दिले. संस्थेच्या तीन ते चार तासाच्या या निस्वार्थ सेवेमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असून जवळपास दोनशे ते अडीचशे भाविकांची चरण सेवा करण्यात आली. शहरातील पालखीचा निवास असलेल्या नॅशनल हायस्कूल मध्ये श्री च्या आरती नंतर चरणसेवेला सुरवात करण्यात आली. या वर्षीच्या चरणसेवेत सेवा देणाऱ्या मध्ये संस्था अध्यक्ष हभप दिवाकर महाराज नेरकर, उद्धव नेरकर, उत्तम काका जाधव, दुर्गेश घारट, केशव नेरकर, स्वप्नील कुलकर्णी, यांच्यासह जलंब, खेर्डा, कुरखेड, लांजुड आदी गावातील संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...