आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:भाकरे टोळी विरुध्द मोक्का कोर्टात दोषारोपपत्र दाखल

नगर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संघटीत गुन्हेगारी करणाऱ्या भाकरे टोळी विरुध्द मोक्का कायद्यान्वये विशेष मोक्का न्यायालयात सुमारे ५०० पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. दोन अल्पवयीनसह एकूण सहा आरोपींचा यामध्ये समावेश आहे. पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून अप्पर पोलिस महासंचालकांच्या परवानगीने हे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.

टोळी प्रमुख प्रेम नरेंद्र भाकरे (वय १९), टोळी सदस्य कुबड्या ऊर्फ किरण दशरथ पालवे, ढाच्या ऊर्फ नाविन्य संजय भाकरे (वय १८), आशिष अशोक भाकरे (वय २५), दोन अल्पवयीन (सर्व रा. नवनागापूर, अहमदनगर) अशी मोक्का कायद्यान्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. अल्ताफ अल्हाउद्दीन बागवान (वय २५रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) या तरुणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. नागापूर येथील सेंट मेरी चर्च येथे ही घटना घडली होती. हा गुन्हा भाकरे टोळीने केल्याचे समोर आले होते. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली होती. या गुन्ह्यासह भाकरे टोळीने केलेल्या इतर गुन्ह्याची माहिती पोलिसांनी काढली. त्यानंतर भाकरे टोळीविरूध्द मोक्का कायद्यान्वये कारवाई केली होती. उपअधीक्षक पाटील यांनी सुमारे ५०० पानी दोषारोपपत्र तयार केले.