आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्लक धान्यांचे वाटप होणार:रेशन दुकानदारांना परवानगी, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांची माहिती

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर - पारनेर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना त्यांचेकडील शिल्लक धान्य संदर्भिय आदेशान्वये सप्टेंबर व डिसेंबरमधुन वाटप करणे कामी परवानगी दिली आहे अशी माहीती तहसिलदार शिवकुमार आवळकंठे यांनी दिली. बोलताना आवळकंठे म्हणाले, रेशन दुकानदारांना धान्य उशीरा मिळाल्याने ई- पाॅस मशिनवर त्याची नोंद करण्यास अडचण येत होती.

त्यामुळे लाभधारकांना ते देता येत नसल्याने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या सुचनेनुसार जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर,ऑक्टोबर २०२२ महिन्यांचे वितरणाचे विकल्प ई-पास मशिनवर उपलब्ध नसल्यास ज्या महिन्याचा विकल्प ई-पाॅस मशिनवर उपलब्ध आहे त्या महिन्यात वाटप करणेच्या सुचना दिल्या आहेत वाटप करीत असताना उपलब्ध शिल्लक धान्य साठ्यातून सर्वप्रथम माहे सप्टेंबर करिताचे धान्य वाटप करावयाचे ते पुर्ण झाल्यानंतरच डिसेंबर महिन्याचे धान्य वाटप सुरू करावयाचे आहे.

कोणत्याही परिस्थितीत लाभार्थ्यास सप्टेंबर व डिसेंबर महिन्याचे धान्य एकत्रित देऊ नये अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाद्वारे देण्यात आलेले आहेत.सदर आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन तहसिलदार आवळकंठे यांनी केले आहे. धान्य दुकादारांनी सर्व नियमांचे पालन करावे आपले स्टाॅक रजिस्टर सह इतर बाबी पुर्तता करून घ्यावी सरकारी यंत्रणेने दुकानात भेट दिल्यानंतर सर्व बाबी न आढळल्यास कारवाई करण्यात येईल.

धान्य उपलब्ध होताच SMS

नागरिकांना आपले धान्य कधी दुकानात आले आहे हे लवकर समजत नाही मात्र आता आम्ही

गावातील लाभधारकांचे मोबाईल नंबर जमा केले आहेत यापुढे नागरिकांना धान्य उपलब्ध झाल्यानंतर सरकारी यंत्रणेद्वारे 'SMS' नागरिकांच्या मोबाईल क्रमांकावर कळणार आहे त्यामुळे उपलब्धतेची माहीती तात्काळ समजणार आहे.

दोन ते तीन महिन्यांचे धान्य मिळाले नाही

संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे गेली पंधरा दिवसांपूर्वी केला होता. यासंदर्भात महसूल मंत्री विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सुचना दिल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...