आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:शिर्डीतील सीआयएसएफ कर्मचाऱ्याची फसवणूक

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘क्रिप्टोकंरन्सी’मध्ये गुंतवणूक करण्याचा बहाणा करून शिर्डी येथे नियुक्तीस असलेल्या सीआयएसएफ कर्मचार्‍याची एकाने ११ लाख ८६ हजार ७७९ रूपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. १६ एप्रिल ते २ ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली. यासंदर्भात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमंत कुमार बिमलप्रसाद यादव (वय ३७ मूळ रा. ग्राम बरोथा, ता. संभूगंज, जि. बांका, राज्य बिहार, हल्ली रा. सीआयएसएफ क्वॉर्टर, शिर्डी ता. राहाता) असे या कर्मचार्‍याचे नाव आहे.

त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीची राजेश सनातनी या टेलीग्रामधारक व्यक्तीसोबत ओळख झाली होती. या ओळखीतून राजेश सनातनी याने फिर्यादीला ‘क्रिप्टोकंरन्सी’मध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले. फिर्यादीचा विश्‍वास संपादन करून ११ लाख ८६ हजार ७७९ रूपये ऑनलाइन घेऊन फसवणूक केली आहे. सुमंत कुमार बिमलप्रसाद यादव यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...