आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:पहिल्या लग्नाची माहिती लपवून विवाहितेची फसवणूक

नगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिले लग्न झालेले असून देखील लग्न झाले नसल्याचे सांगून विवाहितेची फसवणुक करत तिला घरातून हाकलून लावल्याची घटना घडली आहे. केडगाव येथील पीडित विवाहितेने या प्रकरणी भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली होती. तेथे समझोता न झाल्याने भरोसा सेलच्या पत्रानुसार या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीचा पती सुभाष नामदेव भदरगे, दिर निवृत्ती नामदेव भदरगे, सासू राईबाई नामदेव भदरगे व फिर्यादीच्या पतीची पहिली पत्नी आयोध्या सुभाष भदरगे (सर्व रा. नायगाव ईस्ट ता. वसई, जि. पालघर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादीचे सुभाष भदरगे सोबत १९ जानेवारी रोजी लग्न झाले होते. सुभाष व त्याच्या नातेवाईकांनी त्याचे पहिले लग्न झाले असल्याची माहिती फिर्यादीला दिली नव्हती.

लग्न झाल्यापासून ते ९ सप्टेंबरपर्यंत फिर्यादी सासरी नांदत असताना पती, सासू, दिर यांनी उपाशी पोटी ठेवून, शिवीगाळ, दमदाटी केली. फिर्यादीकडून त्यांच्या आईचे दागिने गहाण ठेवून ५२ हजार रूपये घेतले. सुभाषची पहिली पत्नी आयोध्या हिने फिर्यादीला त्यांच्या घरी (नायगाव ईस्ट) येथे येऊन, तू जर मुंबई येथे राहिली तर तुझे तुकडे करून समुद्रात फेकून देऊ, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...