आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिबंधात्मक उपाययोजना:कर्जत तालुक्यात लम्पी आजार रोखण्यासाठी चेक पोस्ट सतर्क

नगर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाभरात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असून मागील काही दिवसात दररोज सरासरी १० जनावरांचा मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राशीन येथे बैठक घेऊन सूचना दिल्या. जनावरांची छुप्या पद्धतीने होत असलेली वाहतूक थांबवण्यासाठी चेक पोस्ट अधिक सक्रियतेने कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी दिली.

जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या लम्पी त्वचा रोगाचा प्रादूर्भाव वेगाने होत आहे. जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील जनावरांचे बाजार बंद केले आहेत तसेच जनावरांची वाहतूक करण्यावरही निर्बंध आणले आहेत. एका जनावरापासून दुसऱ्या जनावरांना होणारा हा आजार म्हैस तसेच गोवंशीय जनावरांमध्ये आढळून येतो. त्याचबरोबर माशा व डासांमुळेही रोगाचा प्रसार होत आहे. लंपीमुळे बाधित जनावरांची संख्या अडीच हजारांच्या पुढे गेली आहे, त्यात कर्जत तालुक्यात राशीन व भांबोरा भागातील जनावरे अधिक बाधित आहेत. डॉ. तुंबारे म्हणाले, राशिन भागात सहाय्यक आयुक्त, ४ पशुधन अधिकारी, विद्यापीठातील दोन शास्त्रज्ञ अकरा परिविक्षाधीन आधिकारी, ११ पर्यवेक्षक अशी अतिरिक्त कुमकही नियुक्त केली आहे.