आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा सण उत्साहात:रात्री 1 वाजेपर्यंत भंडाऱ्याची उधळण करीत मंळगंगा देवीचा जयजयकार; भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडाऱ्याची उधळण करीत मंळगंगा देवीच्या जयजयकाराच्या घोषनांनी परिसर निनादून गेला होता. बुधवारी दुपारी तीन वाजता मंळगंगा देवीची पालखी कुंडावर जाण्यासाठी पालखीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करीत व मळगंगा देवीच्या जयजयकार करीत मंळगंगा देवीच्या पालखीचे दर्शन घेत दसरा सण उत्साहात साजरा केला.

दुपारी तीन वाजता मळगंगा देवीच्या पालखीची मिरवणूक मंदिरापासून काढण्यात आली. यावेळी या मिरवणुकीत हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते. पहाटे पहाटे देवीचे पुजारी गायखे बंधू यांच्या हस्ते पूजा अर्चा करण्यात आली.त्यानंतर महाआरती करण्यात आली. गेली न‌उ दिवस विविध कार्यक्रमांनी नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.‌ मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, मुंबई व निघोज ग्रामस्थ तसेच निघोज ग्रुप ग्रामपंचायत यांच्या वतीने दर्शन व्यवस्था करण्यात आली होती. दहा दिवसांत राज्यातील विविध भागांतून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आले होते.

सर्वाधिक गर्दी सातव्या माळेला झाली होती मंळगंगा मंदिर ते एस टी बस स्थानक परिसरापर्यंत भावीकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी पालखी सोहळा तसेच कुंड परिसरातील मंळगंगा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी पालखी मिरवणुकीने कुंडावर आली. कुंड माउली नवरात्र उत्सव मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने महाप्रसादाचे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.हजारो उपस्थित भाविकांनी पालखीचे दर्शन घेत या भंडारा कार्यक्रमाचा लाभ घेतला. त्यानंतर पालखी पुन्हा मिरवणुकीने गावाकडे आणण्यात आली.चैत्र कालाष्टमीला मळगंगा देवीची यात्रा भरते त्यावेळी मंळगंगा देवीचे वास्तव्य सहा महिने कुंडावर असते.दसऱ्याच्या दिवशी देवी पुन्हा गावात वास्तव्यास येते अशी आख्यायिका आहे.

गावाजवळील खंडोबा पाउतके परिसरात देवीच्या पालखीखाली सोने लुटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर देवीची पालखी पालखी विसाव्यापाशी ठेवण्यात येते यावेळी हजारो महिला भगीनी औंशन करीत देवीची आरती करीत पूजा करतात सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत पालखी विसाव्याजवळ भाविक व महिला भगीनी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात यावर्षी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट व निघोज ग्रामस्थ यांच्या माध्यमातून या ठिकाणी पालखी विसावा सुशोभीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले.

विसाव्यासाठी विशीष्ट दगड वापरीत चौथरा तयार करण्यात आला. रात्री दहा वाजता वाजतगाजत मंळगंगा देवीचा छबिणा मिरवणूकीने रात्री एक वाजता मंळगंगा मंदिरात नेण्यात आला.यावेळी देवीची महा‌आरती करण्यात येऊन दसरा व नवरात्र उत्सव सांगता करण्यात आली. रात्री दहा वाजेपर्यंत झालेल्या या छबिणा मिरवणुकीत पंचवीस हजार पेक्षा जास्त भावीक व महिला मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...