आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जेवढे बोलू तेवढे थोडे आहे. त्यांनी आपल्या स्वराज्याच्या माध्यमातून त्यांनी आपला आदर्श जगासमोर ठेवला. त्यामुळे आजप्रत्येक गोष्ट म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव पुढे येते. त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी आपले सर्व आयुष्य पणाला लावले. तसेच स्त्री सन्मानाचा आदर्शही ठेवला, शेतकऱ्यांसाठी ते मदत करत राहिले, असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपण फक्त जयंती व पुण्यतिथीच्या दिवशीच न ठेवता कायमपणे स्मरणात राहिले पाहिजे, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले. बागरोजा हडको चौक येथील शिव प्रतिष्ठा च्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महापौर शेंडगे, शहरप्रमुख संभाजी कदम, स्थायी सभापती गणेश कवडे, महिला बाल कल्याण सभापती पुष्पा बोरुडे, माजी विरोधीपक्ष नेता संजय शेंडगे, माजी महापौर सुरेखा कदम, भगवान फुलसौंदर, अनिल बोरुडे, नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे, दत्ता कावरे, संतोष गेनप्पा, महिला आघाडीच्या स्मिता अष्टेकर, अरुणा गोयल, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, अनिकेत शेंडगे, गणेश पिस्का, केतन गुंदेचा, मनोज मिसाळ, संतोष नवगिरे, संजय गायकवाड, अस्लम शेख, दिलीप पाटील, विक्रम मिसाळ, बाळासाहेब सोनवणे, गणेश क्यातम, बाळासाहेब व्यापारी, जितेंद्र सासवडकर आदी उपस्थित होते. शिवजयंत निमित्त बागरोजा हडको येथे किल्ल्याची भव्य प्रतिकृती, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची सुमारे ८ फुटांपेक्षा भव्य सिंहासनारुढ मूर्ती विराजमान होती. तुतारीधारक, मावळे असा ऐतिहासिक देखावा सादर केला होता. हा ऐतिहासिक देखावा येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.