आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीतील प्रलंबित विषय मार्गी लावणार:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आश्वासन

शिर्डी4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शिर्डी लोकसभेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांच्या मागण्यांचा नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले, अशी माहिती जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली.

मुख्यमंत्री शिंदे सपत्निक श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आले असताना जिल्हा बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख कोते यांनी शिर्डी तसेच परिसरातील विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सावळीविहीर ते अहमदनगर रस्ता तातडीने पूर्ण झाला व्हावा, गोदावरी कालवे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी २०० कोटींचा निधी देण्यात यावा, साईभक्तांना चांगली व सन्मानजनक व्यवस्था व्हावी आदी मागण्या केल्या.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या मागण्यांचा नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी कोते यांनी मुख्यमंत्री यांचा सत्कार केला. याप्रसंगी नेवासे येथील जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, संपर्क प्रमुख सचिन जाधव, जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, जिल्हाप्रमुख (दक्षिण) बाबुशेठ टायरवाले, युवा सेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ,जिल्हा संघटक विजय काळे, उपजिल्हा प्रमुख शिवाजी चौधरी,राहाता तालुका प्रमुख नाना बावके, कोपरगाव तालुकाप्रमुख रावसाहेब थोरात, संगमनेर तालुकाप्रमुख रमेश काळे, नेवासे तालुका प्रमुख सुरेश डिके आदी उपस्थित होते.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याची मागणी
शेती महामंडळाची शिंगवे शिवारातील पडीक ३०० एकर जमीन साईबाबा संस्थानला देऊन त्याठिकाणी शेगावचे धर्तीवर सुंदर बगीचा ( उद्यान ) उभारण्यात यावे यासाठी जमिन उपलब्ध करून द्यावी, श्री साईबाबा संस्थानमधील कंत्राटी कर्मचारी यांना संस्थान सेवेत कायमस्वरूपी करावे, शिर्डी विमानतळवर नाईट लँडिंग सुरु करावे, श्री साईबाबा मंदिरातील दर्शन व्यवस्था पुर्वरत करावी, आदी मागण्यासंदर्भात जिल्हा प्रमुख काेते यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत चर्चा करून त्या सोडवण्याची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...