आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणाव:बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी कोंडले

अकोले5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अकोले विभागाचे बाल विकास प्रकल्पधिकारी एच. एम. हाके हे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांच्या अंगावर धावून गेल्याच्या कारणांवरून अंगणवाडी कर्मचारी संघटनेने घोषणाबाजी केली. पंचायत समितीत घुसून बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना त्यांच्याच दालनात कोंडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी अकोले पंचायत समितीवर अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मोर्चा काढला होता. या आंदोलनाचे नेतृत्व माकपचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केले. मंगळवारपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रात्र दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करत घोषणाबाजी केली. अकोल्यातील एकात्मिक महिला व बालकल्याण विभागाच्या अकोले व राजुर प्रकल्पांतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अकोले पंचायत समितीवर मोर्चाने जाऊन निदर्शने केली, यांसह आदी मागण्यांचा यात समावेश होता.

मी कामगाराचा मुलगा, असे म्हटल्यानंतर अधिकाऱ्यांना सोडले
या आंदोलनादरम्यान अकोले विभागाचे बाल विकास प्रकल्पधिकारी एच. एम. हाके हे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांच्या अंगावर धावून गेल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. यामुळे आंदोलक आक्रमक झाले. दरम्यान बाल विकास प्रकल्पअधिकारी हाके यांनी आपणही कामगाराचा मुलगा आहे, आमच्या कुटुंबापर्यंत कुणी जाऊ नये, जर आमचेकडून काही चुकले असेल तर मी आंदोलनकर्त्यांची माफी मागतो, असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...