आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानूतन माध्यमिक विद्यालय चिखली येथील १९९७ च्या एसएससी बॅचमधील विद्यार्थ्यांचे गेट-टुगेदर हॉटेल परिवार गार्डन येथे उत्साहात पार पडले. चिखली येथील संजय बिडवे, मनोज हासे तसेच अलका हासे यांनी दहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक मिळवून व्हाॅट्सअप ग्रुप तयार केला व सर्वांना एकत्रित येण्याचे आवाहन केले.
त्याप्रमाणे २४- २५ जणांचा ग्रुप तयार झाला. या सर्व जणांचा स्नेह मेळावा हॉटेल परिवार गार्डन मंगळापुर फाटा येथे उत्साहात पार पडला. तब्बल २६ ते २७ वर्षानंतर या मित्रांच्या व मैत्रिणींच्या भेटी झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. प्रत्येक जण आपले सुखदुःख एकमेकांशी गप्पांच्या रूपाने वाटताना दिसत होते. या विद्यार्थ्यांमध्ये काही इंजिनिअर, लँड डेव्हलपर, मॅनेजर, शिक्षक, प्रगतशील शेतकरी तर काही उत्कृष्ट व्यवसायिक होऊन आपले भविष्य अजमावत आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात इयत्ता दहावी नंतरच्या स्वतःच्या आयुष्यात घडलेल्या अनेक प्रसंगांवर आपले अनुभव कथन केले.
१९९७ साली नूतन माध्यमिक विद्यालय चिखली येथे कार्यरत असलेले शिक्षक कै. वाळूंज सर, आहेर मॅडम, भालेराव सर, सदाफळ सर, हासे सर यांच्याविषयी सर्वांनीच कृतज्ञता व्यक्त केली व पुढील वेळी विद्यालयात अशाच प्रकारचा गेट-टुगेदर ठेवून विद्यालयास भौतिक स्वरूपातील मदत देण्याविषयीची भावना व्यक्त केली. याप्रसंगी निलेश देशमुख, मनोज हासे, संजय बिडवे, सोमनाथ कवडे, विकास कवडे. भारत केरे, नारायण हासे, विजय नवले, दिलीप दिघे, नितीन सिनारे, दत्तू नवले, सोमनाथ हासे, रमेश सहाणे , भाऊसाहेब देशमुख. सोन्याबापु सिनारे, अलका हासे, निर्मला हासे, संगीता पावसे,मनिषा मेमाणे ,योगिता मेमाणे, उषा म्हस्के, शालिनी कानवडे आदी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रास्ताविक संजय बिडवे यांनी, सूत्रसंचालन मनोज हासे यांनी, तर आभार सोन्याबापू सिनारे यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.