आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालमहोत्सवाचे आयोजन:श्रुती संगीत निकेतनतर्फे बालमहोत्सवाचे आयोजन

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रुती संगीत निकेतनतर्फे स्व. दत्तात्रय देशपांडे यांच्या स्मरणार्थ ८ नोव्हेंबरला माऊली सभागृह सावेडी येथे सायंंकाळी सहा वाजता बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बालकलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध गुणदर्शन हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. गायन, तबला वादन, कथ्थक नृत्य, भरतनाट्यम याचे सादरीकरण होणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून धनेश बोगावत हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात श्री गुरू तबला कलासेस, श्रुती संगीत निकेतन, श्री गुरुमाऊली नृत्यालय, नृत्यझंकार, अनाहत तबला अकॅडमी, श्री सरस्वती संगीत विद्यालय, अंजली नृत्यालय, कथ्थक नृत्यालय या सर्व विद्यालयाचे सुमारे १०० विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण संगीत विषयक प्रश्नावली असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...