आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालहान वयात मुलांचे पोषण होण्यासाठी त्यांना चांगला सकस आहार मिळणे गरजेचे आहे. यासाठी न शिजवताही अनेक पौष्टिक व रूचकर पदार्थ तयार करता येतात. फळे, फळभाज्या, हिरव्या पालेभाज्या, दूध, डाळिंब, भेळ, सॅण्डविच सारखी पदार्थ मुले आवडीने खातात. अतिशय झटपट आणि तितकेच पौष्टिक असलेले हे पदार्थ मुलांच्या शारीरिक व बौध्दीक वाढीसाठी पूरक ठरत असल्याचे प्रतिपादन माणिकनगर येथील माइंड चॅम्पस प्री स्कूलच्या संस्थापक संचालिका पुष्पा गांधी यांनी केले.
माइंड चॅम्पस प्री स्कूलमध्ये फायरलेस कुकिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पालक तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत, अनेक सुंदर पाककृती सादर केल्या. ‘हायजिन फर्स्ट’च्या संस्थापक वैशाली गांधी व राखी सागर गांधी यांनी स्पर्धेत परीक्षण केले. पालक व मुलांनी एकत्रित अनेक चांगल्या रेसिपी सादर केल्या. यात फळे, पालेभाज्या, दूध, बटर, मुरमुरे, बिस्किट व टॉपिंग्ज अशा नानाविध पदार्थांचा समावेश होता.
परीक्षकांनी सर्व स्पर्धकांच्या रेसिपीचे कौतुक केले. वैशाली गांधी म्हणाल्या , सर्व रूचकर पदार्थ तयार करताना पालकांनी अतिशय कल्पकता दाखवली. असे निरनिराळे पदार्थ डब्यात दिल्यास, मुले ती आनंदाने खातील. तसेच हायजिनही चांगले राहते. अशा स्पर्धेतून सर्वच पालकांना वेगवेगळ्या पौष्टिक रेसिपींची माहिती होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.