आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज घरातील संवाद हरवत चालला आहे. घरातील सर्वजण जरी एकत्र आले तरी मोबाईलच्या अमर्यादित वापराने एकमेकांशी बोलणे संपले आहे. वयात येणाऱ्या मुलांनी आईवडिलांशी संवाद साधत येणाऱ्या अडचणी सांगितल्या पाहिजे. आईवडिलांशी नियमित संवाद ठेवा. फास्ट फूडऐवजी घरातील अन्न तसेच हिरव्या पालेभाज्या,कडधान्य यांचा वापर करावा. योग्य आहार,सकारात्मक विचार, आत्मविश्वास व योग्य संवाद याचा अवलंब केल्यास तुम्ही कोणत्याही अडचणीना सामोरे जाऊ शकाल, असे प्रतिपादन बालरोगतज्ञ डॉ. सुचित तांबोळी यांनी केले.
सावेडीतील ज्ञानसंपदा शाळेत डॉ. तांबोळी यांचे वयात येताना येणाऱ्या अडचणी या विषयावर ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांकरीता चर्चासत्राचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष कारभारी भिंगारे हे होते. यावेळी मुख्याध्यापिका शिवाजंली अकोलकर, पर्यवेक्षिका निलिमा निचित आदी उपस्थित होते. डाॅ. तांबोळी म्हणाले,परीक्षेची तयारी करताना त्यांचा ताण घेऊ नका. सकारात्मक विचार करत अभ्यास करा. काही अडचणी असल्यास आपल्या शिक्षक व पालकांशी संवाद साधून ते सोडवा. अभ्यास करताना नियोजन करा. यावेळी शारीरीक, मानसिक, भावनिक तसेच अभ्यासाबाबत मुलांसमवेत चर्चा झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.