आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रामध्ये झालेल्या परिवर्तना नंतर शिंदे- फडणवीस सरकारने महिला सुरक्षिततेचा विषय अजेंड्यावर घेतला आहे. महिलांबाबतीत खूप मोठे व महत्वाचे निर्णय घेतले आहे. आता महिला -मुलींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांची गय केली जाणार नाही. असा इशारा भाजपच्या महिला आघाडीचा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी शनिवारी (10 डिसेंबरला) दिला.
भाजपा महिला आघाडीचा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ अहमदनगर शहरात आल्या होत्या. भाजप शहर महिला आघाडीच्या वतीने अशोकभाऊ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण व जागृती मेळाव्यात वाघ बोलत होत्या.
हे होते उपस्थित
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, महिला आघाडी अध्यक्षा अंजली वल्लाकटी, प्रदेश सदस्या गीता गिल्डा, जिल्हाध्यक्षा अश्विनी थोरात, माजी उपमहापौर गीतांजली काळे, अकोल्याच्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, महिला बालकल्याण सभापती लता शेळके, ओबीसी महिला आघाडी अध्यक्षा रेखा विधाते, स्वाती पवळे, शुभांगी साठे, सोनाली चितळे आधी यावेळी उपस्थित होते.
काय म्हणाल्या चित्रा वाघ ?
वाघ म्हणाल्या, आठ वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांच्या सारख्या सक्षम व्यक्तीने देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा हातात घेतल्यापासून देशात विकासाचे वारे वाहू लागले आहेत. जे 70 वर्षात झाले नाही ते अवघ्या 8 वर्षांत नरेंद्र मोदींनी करून दाखवले आहे. देशातील मातृशक्तीच्या सर्व गरजा ओळखून त्यांनी महिलांसाठी खूप सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यामध्ये झालेल्या परिवर्तना नंतर शिंदे -फडणवीस सरकारने महिला सुरक्षिततेचा विषय अजेंड्यावर आणला आहे. असे वाघ यांनी सांगितले.आता महिला मुलींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांची गय केली जाणार नाही.असा इशारा वाघ यांनी दिला.
मुलींनो सोशल माध्यमांचा योग्य वापर करा
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, युवक युवतींना संविधाने व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. पण या स्वातंत्र्यचा स्वैराचार करू नका. आई - वडील इतकं प्रेम जगामध्ये कोणीच करत नाही. या वयात मुलींना खूप प्रलोभने येतात. हे प्रलोभने भुलभुलैय्या आहेत. आता प्रत्येकाकडे इंटरनेट आहे. सोशल मीडिया सारखे जग जवळ आणणारे माध्यम तुमच्याकडे आहे. त्याचा योग्यच वापर करा. त्याच्या दुरुपयोगामुळे एक श्रद्धा वालकर बळी पडली आहे. असे वाघ यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.