आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे, त्याचबरोबर अनेक क्षेत्रात करिअरच्या संधीही उपलब्ध होत असतांना विद्यार्थी व पालकांची तारांबळ उडते. अशा परिस्थितीत योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आपल्या क्षमतेनुसार पुढील अभ्यासक्रमाची निवड करण्यास सोपे जाऊ शकते, असे आवाहन सीजीएसटीचे माजी सुपरिटेंन्डेट सुहासकुमार देठे यांनी केले.
‘माझी सामाजिक बांधिलकी’ उपक्रमांतर्गत दहावी, बारावी नंतरच्या पुढील वाटा या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन देठे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डी.जी.भांबळ, तर अध्यक्षस्थानी नगर कॉलेजचे उपप्राचार्य विनित गायकवाड, प्रा.प्रतुल कसोटे, प्राचार्या ज्योत्स्ना शिंदे, मुख्याध्यापिका अनिता सूर्यवंशी आदि उपस्थित होते.
या शिबीरात प्रा.डॉ.प्रितमकुमार बेदरकर यांनी कला, वाणिज्य व विज्ञान शाखांनंतर करिअरच्या संधी तर डॉ. शालिनी उजागरे यांनी वैद्यकिय शिक्षणाच्या संधी व महत्त्व विषद केले. आदिल मेस्त्री यांनी स्पर्धा परीक्षा व रविंद्र लोंढे यांनी स्पोर्टस् करिअर घडविण्याचा मार्ग सांगितला. गणेश हडतगुणे यांनी कौशल्य प्रशिणि काळाची गरज तर भारतीय सेना दलातील नोकरीच्या संधी या विषयावर मेजर प्रा.डॉ.शाम खरात यांनी माहिती दिली. या सर्व अभ्यासू व नामांकित वक्त्यांनी आपल्या विषयावर प्रोजेक्टद्वारे माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व दिशा देण्याचा प्रयत्न केला.
लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, टिळकरोड येथे झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रार्थना करुन शिरिष लाड यांनी शास्त्रपठाणाचे वाचन केले. प्रास्तविक कमलाकर देठे यांनी केले. आभार राजेश सुर्यवंशी यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.