आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्ह्याची नोंद:चक्क रोड रोलरच गेला चोरीला... ; अज्ञात आरोपीविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

कोपरगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चांदेकसारे येथील समृद्धी महामार्गाच्या कामासाठी असलेल्या गायत्री कन्स्ट्रक्शनच्या कंपाऊंड मधून अज्ञात व्यक्तीने के. विजयकुमार रेड्डी यांच्या मालकीचा १२ लाख रुपये किमतीचा रोडरोलर एपी ०३, टी ३९०२ हा चोरट्याने चोरुन नेला. ही घटना २९ मे रोजी घडली. याबाबतची फिर्याद बाबू जलापती रेड्डी वय वर्ष ४२ धंदा खाजगी नोकरी मूळ राहणार आयतापल्ली तालुका- पेगडापेल्ली, जि. करिमनगर राज्य- तेलंगणा यांनी मंगळवारी १४ जून फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुरेश आव्हाड पुढील तपास करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...