आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:टाक्यांमधून गॅस चोरी करताना नागरिकांनी रंगेहात पकडले

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वक्रतुंड भारत गॅस एजन्सीच्या टॅम्पोतील (एमएच १५ इजी ७३४४) गॅस टाक्यामधील गॅस टाकीतून गॅसची चोरी करताना स्थानिक नागरिकांनी टेम्पो चालक व त्याच्या कामगारांना रंगेहाथ पकडले. नागरिकांनी त्यांच्याकडे चौकशी करताच ते पळून गेले. कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन टेम्पो ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणला. या प्रकरणी प्रशांत बाळकृष्ण भाले (वय ३३, रा. अमितनगर, केडगाव देवी रोड) यांनी फिर्याद दिली असून सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास केडगाव परिसरातील अमित नगर येथे ही घटना घडली. भाले यांचे मित्र ज्ञानेश्वर चंद्रकांत गोरे यांनी त्यांना फोन करून वक्रतुंड भारत गॅस एजन्सीच्या टॅम्पोतील गॅस टाक्यामधील गॅस रेग्युलेटर व पाईपच्या सहाय्याने टॅम्पो चालक व कामगार हे रिकाम्या टाकीमध्ये भरत असल्याचे सांगितले.

त्यांनी चालक व कामगाराकडे चौकशी करताच ते पळून गेले. त्यांनी तत्काळ कोतवाली पोलिस ठाण्यात योगेश भिंगारदिवे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच सपोनि विवेक पवार, योगेश भिंगारदिवे, योगेश खामकर, सुजित हिवाळे, सोमनाथ राउत, गाडे तसेच अन्न व पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर टेम्पोसह १७ गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या.

मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता
वर्षभरापूर्वी तोफखाना पोलिसांनी अशाच पद्धतीने भारत गॅस कंपनीच्या टाक्यांमधून गॅसची चोरी करताना कामगारांना रंगेहाथ पकडले होते. यात सर्व कर्मचारी परप्रांतीय होते. शनिवारी नागरिकांनी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला, त्यातही परप्रांतीय कामगारच होते. त्यामुळे या घटनेचा सखोल तपास झाल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...