आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समूह राष्ट्रगीत गायन:नगरमध्ये एकाच वेळी ७५ ठिकाणी नागरिकांनी गायले सामुहिक राष्ट्रगीत

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या” निर्णयानुसार बुधवारी शहरातील गांधी मैदान येथे समूह राष्ट्रगीत गायन पार पडले. यात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ७५ ठिकाणी सार्वजनिक भोंग्याद्वारे एकाच वेळी सामूहिक राष्ट्रगीत गायन प्रसारित करण्यात आले.राष्ट्रगीत गायनासाठी सकाळपासूनच गांधी मैदान परिसरात नागरिक गर्दी करताना दिसून आले. यात श्री मार्कंडेय विद्यालय व प्रगत विद्यालयातील शिक्षक व पालक यांनी सहभाग नोंदवला. सर्व ७५ ठिकाणी सार्वजनिक भोंग्याद्वारे एकाच वेळी प्रसारण झाले. नागरीकांनी जागेवर उभे राहून राष्ट्रगीत म्हणून या अभियानात सहभाग घेतला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या आवाहनानुसार भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी सामूहिक राष्ट्रगीत गायनाचे आयोजन केले. भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य भानुदास बेरड, भाजपचे शहराध्यक्ष भैया गंधे, ज्येष्ठ नेते अभय आगरकर, प्रगत महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील पंडित, श्री मार्कंडे विद्यालयाचे उपप्राचार्य पांडुरंग गोणे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे ,सचिन पारखी,किशोर बोरा, वसंत लोढा, अजय चितळे, प्रशांत मुथा, गोपाल वर्मा, बंटी डापसे, गौतम कराळे, विलास नंदी, गौतम कुलकर्णी, महावीर कांकरिया शशिकांत देशमुख आदी नागरिकांनी अभियान यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...