आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:रस्त्याच्या दुरवस्थेमुळे तोफखान्यात नागरिकांचे खड्ड्यात बसून आंदोलन

नगर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी दिलेल्या दहा कोटी रुपयांच्या निधीतून प्रभाग नऊमधील तोफखाना भागातील सुराणा बिल्डिंग ते मेहसुनी ट्रेलर ते शितळादेवी रस्ता मंजूर होता. परंतु, प्रशासनाकडून अद्याप या रस्त्याचे काम मार्गी लावले गेले नाही. यापार्श्वभूमीवर माजी उपमहापौर मालन ढोणे तसेच माजी नगरसेवक अॅड. धनंजय जाधव यांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून दैनंदिन कामकाज करत निषेध नोंदवला.

तोफखाना भागातील रस्त्याचे रखडलेले काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी या भागातील नागरिकांनी रस्त्यावर बसून सोमवारी आंदोलन सुरू केले. माजी नगरसेवक जाधव, माजी उपमहापौर ढोणे, कल्पेश परदेशी, ऋषिकेश गुंडला, डॉ. प्रशांत सुरकुटला, विशाल वाघमारे, शाम रोकडे, दिलीप गरके, विनोद रच्चा, वैभव सावेडकर, सागर सावेडकर, सचिन दिवाने आदी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, तीन वर्षांपासून सार्वजनिक बांधकामाशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु, प्रशासनाने आमच्या मागणीची कोणतीही दखल घेतली नाही. नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याचे काम २०१९ मध्ये मंजूर असतानाही बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराकडून या रस्त्याचे काम करून घेतले नाही. जोपर्यंत रस्त्याचे काम होणार नाही, तोपर्यंत आम्ही इथेच बसणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, रस्त्याची मोठी दूरावस्था झाली आहे. असाच प्रश्न नगर शहरातील अंतर्गत रस्त्यांचाही निर्माण झाला आहे.

भाव वाढीचे खापर कुणावर फोडणार?
या कामासाठी जानेवारी २०१९ मध्ये कार्यारंभ आदेश दिले असताना, मनपाने ३० डिसेंबर २०२१ रोजी या कामासाठी नाहरकत दाखला दिला आहे. परंतु, नाहरकत मिळेपर्यंतच्या तीन वर्षांच्या अवधीत डांबराचे भाव तीनपट वाढले आहेत. त्यामुळे ठेकेदार काम करण्यास तयार नाही. त्यातच त्यामुळे मनपा व राज्य सरकारने यामध्ये तोडगा काढावा, असा सूर प्रशासकीय स्तरावरून अळवला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...