आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसहभाग:नागरिकांना अंत्यविधीसाठी मिळणार निशुल्क स्टीलची तिरडी ; पारंपारिक परंपलेला दिला फाटा

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंत्यविधीसाठी बांबू व जनावरांचा चारा असलेल्या कडब्यापासून बनविण्यात येणार्‍या तिरडीला पर्याय म्हणून तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने शहरातील अमरधामांना स्टीलची तिरडी भेट देण्याचे उपक्रम सुरु करण्यात आले आहे. या अभियानाची सुरुवात रेल्वे स्टेशन येथील वैकुंठधाम येथून केली. कार्यक्रमाची सुरुवात धम्म प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी भन्ते सचित बोधी, भन्ते महा मोगलायन, भन्ते प्रज्ञाशील यांच्या हस्ते स्टीलची तिरडी वैकुंठधामला भेट देण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय कांबळे, सत्येंद्र तेलतुंबडे, अ‍ॅड. संतोष गायकवाड, संध्या मेढे, रोहित आव्हाड, नगरसेवक राहुल कांबळे, प्रशांत गायकवाड, किरण दाभाडे, अविनाश भोसले, विजय भांबळ, दीपक अमृत, विलास साठे, विवेक भिंगारदिवे, आप्पा बनसोडे, दीपक लोंढे, मच्छिंद्र घाटविसावे, दीपक गायकवाड, सिद्धांत कांबळे, अमोल गायकवाड, रंगनाथ साळवे, सतीश खैरे, सुशांत म्हस्के, मिलिंद आंग्रे, विष्णू ठोंबे, विजय शिरसाठ, अण्णा गायकवाड, सुरेश बोरुडे, अशोक बागुल, प्रवीण चाबुकस्वार आदी उपस्थित होते. अंत्यविधीसाठी लाकडी बांबू व जनावरांच्या चारा असलेल्या कडब्यापासून तिरडी बनवतात. वेळप्रसंगी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाल्यास कडबा मिळणे अवघड होते. तर कुटुंबीय, नातेवाईकांची धावपळ होते. तसेच तिरडीमुळे जनावरांचा खाद्य असलेल्या कडब्याचे नुकसान होते. यासाठी पर्याय म्हणून तथागत बुद्धिस्ट सोसायटीने पुढाकार घेऊन नागरिकांना निशुल्क स्टीलची तिरडी उपलब्ध होण्यासाठी शहरातील सर्व अमरधामला ही तिरडी भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला.

भन्ते सचित बोधी यांनी बुद्धिस्ट सोसायटीचे धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले. तर पारंपारिक रुढी, परंपरेला फाटा देऊन नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन चळवळीला गती देण्याचे आवाहन केले. विलास साठे म्हणाले, बुद्धिस्ट सोसायटीने धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी व सामाजिक कार्याची जोड देऊन समाजाला आधार देण्याचे कार्य सुरु केले आहे.

लाेकवर्गणीतून उभारला जातोय धम्मरथ तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या माध्यमातून धम्माच्या प्रचार प्रसारासाठी लोकवर्गणीतून धम्मरथ उभारला जात आहे. यासाठी नगरसेवक राहुल कांबळे, प्रशांत गायकवाड, किरण दाभाडे यांनी प्रत्येकी ११ हजार रुपये, अविनाश भोसले, रोहित आव्हाड यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये दिले. तर सतीश खैरे यांनी गाडी उपलब्ध करून दिली आहे. या धम्म रथाची सजावट शांताराम बनसोडे व अशोक बागुल निशुल्क करणार आहेत. इतरांनीही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...