आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील २७ पैकी १९ गावांमध्ये प्रस्थापितांना सत्ता राखण्यात यश मिळााले. तर ८ गावांमध्ये सत्तापरिवर्तन झाले आहे. तालुक्यातील १८ पेक्षा जास्त ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात राहिल्याने भाजपाचा बोलबाला दिसून आला. पारनेर विधानसभा मतदार संघातील गावांमध्ये अनेक आमदार लंके समर्थक निवडणूक आले आहेत.
तालुक्यातील २७ पैकी पिंपळगाव लांडगा ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून उर्वरित २६ ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी पार पडली. तालुक्यातील पांगरमल, आगडगाव, मदडगाव, नारायण डोहो, टाकळी खातगाव, कौडगाव, रांजनी आठवड या ठिकाणी सत्ता परिवर्तन दिसून आले. तर उर्वरित १९ ठिकाणी सत्ताधारी गटांनी सत्ता राखण्यात यश मिळवले. २७ पैकी १८ पेक्षा अधिक गावांमध्ये सत्ता मिळवण्यात भाजपाला यश मिळाल्याचे निकालावरून दिसत आहे. तर काही ठिकाणी स्थानिक गावपातळीवरील आघाड्या असल्याने सर्वांनीच त्यावर दावा केला आहे.
गावनिहाय नवनिर्वाचित सरपंच याप्रमाणे - पिंपळगाव लांडगा - अनिता दीपक लांडगे बिनविरोध, सोनेवाडी पिला - बाबासाहेब एकनाथ बेरड, दहिगाव - सुरेखा मधुकर म्हस्के, बाबूर्डी बेंद - मंदा सुनील खेंगट, पांगरमल - अमोल भरत आव्हाड, वडगाव तांदळी - इंदूबाई रावसाहेब रणसिंग, साकत - नंदू दत्तू पवार, राळेगण म्हसोबा- दीपाली सुधीर भापकर, आगडगाव- आशाबाई परमेश्वर पालवे, नेप्ती- सविता संजय जपकर, सारोळा कासार- आरती रवींद्र कडूस, मदडगाव- साहेबराव छबुराव शेडाळे, आठवड- सविता सुनील लगड, नांदगाव- सखाराम मालू सरक, उक्कडगाव- हेमलता नवनाथ म्हस्के, नारायण डोहो- श्रद्धा बाळासाहेब साठे, सारोळा बद्दी- गयाबाई शंकर डहाने, शेंडी- प्रयागा प्रकाश लोंढे, वाळकी- शरद भाऊसाहेब बोठे, कापूरवाडी- जनाबाई साहेबराव दुसुंगे, टाकळी खातगाव- सुनीता राजेंद्र नरवडे, कौडगाव- सविता रावसाहेब खर्से, रांजनी- लहानु ठोंबे, पिंपळगाव कौडा- प्रतिभा बाळासाहेब शिंदे, जखणगाव- डॉ. शंकरप्रसाद गंधे, सोनेवाडी चास- विठ्ठल दळवी, खातगाव टाकळी- रूथा वैराळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.