आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संचालकांचा सत्कार‎:शहर सहकारी बँकेचे नेहमीच‎ सामान्यांना आर्थिक पाठबळ‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर सहकारी बँकेने नेहमीच‎ सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ‎ देऊन उभे करण्याचे काम केले‎ आहे. बँकेच्या चांगल्या‎ कारभारामुळे बँक नेहमीच‎ प्रगतीपथावर राहिली. नुकत्याच‎ झालेल्या निवडणुकीत सभासदांनी‎ सुयश पॅनेलच्या माध्यमातून‎ संचालक मंडळाने मिळविलेले यश‎ कौतुकास्पद आहे. नूतन संचालक‎ बँकेच्या लौकिकात नक्की भर‎ घालतील, असा विश्वास‎ नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी‎ व्यक्त केला.

नंदनवन मित्रमंडळाच्या वतीने‎ शहर बँकेच्या निवडणुकीत विजयी‎ झालेल्या सर्व संचालकांचा सत्कार‎ करण्यात आला. त्यावेळी सुवर्णा‎ जाधव बोलत होत्या. नूतन‎ संचालक सुभाष गुंदेचा, सीए गिरीष‎ घैसास, डॉ. विजयकुमार भंडारी,‎ अशोक कानडे, शिवाजी कदम, डॉ.‎ भूषण अनुभुले, जयंत येलूलकर,‎ निखील नहार, स्वाती कांबळे,‎ प्रदीपकुमार जाधव, दत्तात्रेय‎ रासकोंडा, संजय घुले आदींसह‎ महानगर अध्यक्ष दत्ता जाधव,‎ मार्गदर्शक संजय जाधव, सूरज‎ जाधव, कैलास गाडीलकर, हेमंत‎ जाधव, कपिल जाधव आदी‎ उपस्थित होते.‎

सत्कारास उत्तर देताना, ज्येष्ठ‎ संचालक सुभाष गुंदेचा म्हणाले, की‎ बँकेचे संस्थापक स्व. मुकुंद घैसास‎ यांचे बँकेच्या प्रगतीत मोठे योगदान‎ राहिले आहे. त्यांच्या विचारांचा‎ वारसा आम्ही सर्व संचालक पुढे‎ चालवत आहोत. सभासदांनी‎ आमच्यावर जो विश्वास टाकून‎ आम्हास पुन्हा बँकेचा कारभार‎ चालविण्याची संधी दिली, त्या‎ विश्वासास पात्र राहून बँक नेहमीच‎ प्रगतीपथावर कशी राहिल, यासाठी‎ प्रयत्न करू.‎ याप्रसंगी दत्ता जाधव यांनी सर्व‎ संचालकांचा परिचय करुन दिला.‎ संजय जाधव यांनी सर्वांचे आभार‎ मानले.‎

बातम्या आणखी आहेत...