आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये शहर काँग्रेस आक्रमक:चंद्रकांत पाटलांच्या निषेधार्थ आंदोलन; नगरमध्ये फिरू न देण्याचा दिला इशारा

अहमदनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच कर्मवीरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद नगरमध्येही उमटले आहेत. नगर शहर काँग्रेसने मंत्री पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करून, नगरमध्ये फिरू देणार नाही असा इशारा दिला.

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री पाटील यांनी केले होते. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या वक्तव्यानंतर नगर शहरातील काँग्रेस कार्यकर्ते, काळे यांच्या नेतृत्वाखाली रात्री उशिरा एकत्र जमले होते. मंत्री पाटील यांच्या उलट्या प्रतिमा हातात धरून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मंत्री पाटील यांना काँग्रेस कार्यकर्ते त्यांना नगरमध्ये फिरू देणार नाहीत, असा इशारा यावेळी काळे यांनी बोलताना दिला.

यावेळी यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, फैयाज शेख, शम्स खान, प्रवीण गीते पाटील, अभिनय गायकवाड, अभिनय गायकवाड, साबीरभाई शेख, इमरान बागवान, जरीना पठाण, डॉ. जाहिदा शेख, मंगल भुजबळ, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषा भगत आदी उपस्थित होते.

किरण काळे म्हणाले की, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले या दांपत्याने अत्यंत संघर्षातून शिक्षणाच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी अमुलाग्र काम केले. कर्मवीर भाऊराव पाटलांनी बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वटवृक्षाप्रमाणे काम केले. अशा पवित्र कार्यात सामाजिक योगदान आणि लोकसहभाग मिळवण्याच्या कामाला भीक मागितली असं म्हणून, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचा अवमान करत आहे. हा अवमान वेदना देणारा आहे. असे देखील ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...