आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईचा इशारा:नागरिकांच्या तक्रारीची शहर वाहतूक शाखेकडून दखल

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावेडीतील गायकवाड कॉलनी, अर्बन बँक कॉलनी व लॉयड कॉलनी परिसरात असलेल्या सात मोठ्या रुग्णालयांमुळे होणार्‍या वाहतूक कोंडीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी (५ डिसेंबर) शहर वाहतूक शाखेच्या वतीने रुग्णालय प्रशासन व स्थानिक नागरिकांची संयुक्त बैठक घेण्यात आली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व रुग्णालयांनी पार्किंगचे नियोजन करुन, वाहने रस्त्यावर लागणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. येत्या सात दिवसात नियोजन न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी दिला.

रुग्णालयांच्या पार्किंग प्रश्नी सोमवारी बैठक पार पडली. यावेळी स्थानिक नागरिकांच्या वतीने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे, अ‍ॅड. संजय दुशिंग, अ‍ॅड. व्हि.के. पंडित, अतुल मांजरे, गुलशन बोरा आदींसह रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. रुग्णालय प्रतिनिधींनी यावर तातडीने उपाययोजना करुन स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...