आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणमारी:जमिनीच्या मोजणीवरून लिंपणगावात माने व कुरूमकर गटात हाणमारी

श्रीगोंदे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतीच्या वादातून तालुक्यातील लिंपणगाव येथे दोन गटात जमिनीच्या मोजणीवरून हाणामारी झाली. यात प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष बापू माने आणि त्यांचे चिरंजीव यांना मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी लिंपणगाव येथील १३ जणांवर अॅट्रॉसिटी कलमान्वये श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लिंपणगाव येथील अशोक ओहोळ यांनी शेतजमीन २५ ऑगस्ट २०२१ रोजी प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष माने यांना विकली होती. या जमिनीशेजारी प्रविण कुरुमकर यांची जमीन आहे.

या दोघांत जमिनीच्या हद्दीवरून वाद असल्याने या जमिनीची मोजणी करून माने यांना ताब्यात देण्यासाठी शासकीय मोजणी बोलावली होती. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात मोजणी सुरू केली. प्रविण कुरुमकर, संतोष भोंडवे, किरण भोंडवे, सागर भोंडवे, ताराबाई भोंडवे, शुभांगी कुरुमकर, मनिषा भोंडवे, संभाजी सूर्यवंशी, विजय कुरूमकर, उमेश वेताळ, मयूर चव्हाण, हनुमंत रेवगे, निता पंधरकर यांनी मोजणी ठिकाणी येऊन ओहोळ यांना शिवीगाळ करत बापू माने आणि त्यांचा मुलगा उदय यांना शिवीगाळ केली. प्रविण कुरूमकर याने उदयच्या डोक्यात खुरपे मारुन गंभीर जखमी केले. या प्रकरणी प्रकरणी लिंपणगाव येथील १३ जणांवर अॅट्रॉसिटी कलमान्वये श्रीगोंदे ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, मोजणीसाठी गेलेले भूमी अभिलेख कार्यालयाचे गोरक्ष चव्हाण यांना संतोष भोंडवे, सागर भोंडवे, ताराबाई भोंडवे, प्रविण कुरूमकर यांनी मज्जाव केला. सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याने चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चाैघांवर गुन्हा दाखल केला. घटनास्थळी उपनिरीक्षक समीर अभंग आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवल्याने मोठा अनर्थ टळला.

बातम्या आणखी आहेत...